भारताचे तात्कालिन उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांचा राजीनामा नेमका का झाला? काय म्हणतो अनुच्छेद ६७(अ)

Jagdeep Dhankhar Resing:

भारताचे उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला?

त्यांनी दिले हे कारण अनुच्छेद ६७(अ) पण नेमक आहेत तरी काय या अनुच्छेद मध्ये?


२१ जुलै ला भारताचे उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांनी अचानक आरोग्याची समस्या सांगून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता
.
आपल्या पदाचा राजीनामा देतांना त्यांनी संविधानाचा अनुछेद ६७(अ)वापर केला.
.

राष्ट्रपतीना लिहलेल्या पत्रात त्यांनी सांगितले-

“महामहीम राष्ट्रपतिच्या पाठबळामुळे आणि माझ्या कार्यकाळात निर्माण झालेल्या सुंदर अश्या नातेसंबधाबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.”

“माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळचाही मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या सहकार्यमुळे मला खूप काही शिकायला मिळाले.”

“संसद सदस्याकडून देखील मला मिळालेला विश्वास, प्रेम आणि आत्मीयता सदैव लक्षात राहील.”

“भारताचे प्रगती आणि विकासाचे साक्षीदार होणे आणि त्याचा भाग बनणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”

संविधानाचा अनुच्छेद ६७(अ) काय सांगतो?

भारतीय संविधानातील अनुच्छेद ६७ उपराष्ट्रपतिच्या कार्यकाळाशी संबंधित आहे.

अनुच्छेद ६७(अ) नुसार उपराष्ट्रपति आपली स्वाक्षरी केलेला राजीनामा राष्ट्रपतीना सादर करून पदाचा त्याग करू शकतात.

थोडक्यात सांगायचे झाले, तर अनुच्छेद ६७(अ) हे उपराष्ट्रपतींना राजीनामा देण्याचा अधिकार देतो.

उपराष्ट्रपति संबधित इतर महत्वाचे अनुच्छेद:

१) अनुच्छेद ६३ भारताचा एक उपराष्ट्रपति असेल.

२) अनुच्छेद ६४ उपराष्ट्रपति राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतो.

३) अनुच्छेद ६५ उपराष्ट्रपति प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करू शकतो.

४) अनुच्छेद ६६ उपराष्ट्रपतिची निवडणूक. ( त्यांना राज्यसभा व लोकसभा सदस्य मतदान करतात)

५) अनुच्छेद ६७ उपराष्ट्रपति कार्यकाळ.

जीवन परिचय

भारताचे तत्कालिन उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांचे जीवन ते एक प्रख्यात वकील, राजकारणी आणि संसदीय परंपरेचे जाणकार व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थान राज्यातील किठाना या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते अभ्यासू आणि जिज्ञासू होते.

शिक्षण:

जगदीप धनखड यांनी सुरवातीचे शिक्षण गावातच घेतले.

त्यानंतर त्यांनी सायन्समध्ये पदवीपूर्ण करून कायद्याचे शिक्षण ( LLB) घेतली. पुढे वकील व्यवसायात प्रस्थापित झाले आणि राजस्थान उच्च न्यायलयात वरिष्ठ वकील म्हणून आपली साप सोडली.

राजकीय कारकीर्दी:

१९८९ मध्ये त्यांनी जनता दलाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक जिंकली.

संसदमध्ये ते कायदेविषयक समित्यांवर कार्यरत राहिले.

नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला.

२०१९ मध्ये त्यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली.

या काळात त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि राज्यातील शासनासोबत मतभेदांवर देशभर चर्चा झाली.

उपराष्ट्रपतिपद:

२०२२ मध्ये जगदीप धनखड यांची भारताची १४ वे उपराष्ट्रपति म्हणून निवड झाली. हे पद भूषवणारे ते राजस्थानातील पहिले व्यक्ति ठरले.

ते सध्या चर्चेत का आहेत?

१) ते राज्यसभेचे सभापती म्हणून संसदेतील शिस्त आणि नियमपालनयावर यावर भर देतात.

२) ते अनेदा संविधानिक मूल्य, न्यायव्यवस्था आणि लोकशाही परंपरा यावर थेट आणि स्पष्ट भाष्य करतात.

३) अलीकडेच (२०२५ मध्ये) संसदेत महत्वाच्या विधेयकांवर झालेल्या चर्चेत त्यांच्या व्यक्तव्यंमुळे आणि निर्णयक्षम भूमिकेमुळे ते बातम्यांमध्ये आले.

निष्कर्ष असा असा निघतो.

जगदीप धनखड हे शेतकरी पुत्र ते उपराष्ट्रपति असा प्रेरणादायी प्रवास करणारे नेते आहेत त्यांची कार्यशैली आणि ठाम भूमिका यामुळे ते भारतीय राजकारणारत नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

5 thoughts on “भारताचे तात्कालिन उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांचा राजीनामा नेमका का झाला? काय म्हणतो अनुच्छेद ६७(अ)”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *