मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : ई-केवायसी प्रक्रियेमुळे महिलांचे डोकेदुखी वाढली

e-Kyc करतांना तांत्रिक अडचण येत आहे.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 सन्मान निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतो.

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे

मात्र, या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा यासाठी शासनाने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. शासनाने दोन महिन्यांचा कालावधी दिला असला तरी सध्या वेबसाईट नीट न चालल्याने महिलांचे आणि ई-केवायसी करणाऱ्यांचे मोठे डोकेदुखी सुरू झाले आहे.

वेबसाईट सुरू होत नाही, OTP उशिरा येतो.

लाभार्थींनी तक्रार केली आहे की –

वेबसाईट उघडायला खूप वेळ लागतो.

काही वेळा वेबसाईट अजिबात चालत नाही.

OTP वेळेवर मिळत नाही किंवा अजिबात मिळत नाही.

माहिती भरताना पेज हँग होते.

यामुळे महिलांना आणि त्यांना मदत करणाऱ्या CSC सेंटरमधील ऑपरेटर्सना अनेकदा पुनःपुन्हा प्रयत्न करावे लागत आहेत.

केवायसी करणाऱ्यांचे डोकेदुखी

जिल्ह्यांमध्ये हजारो महिला एकाचवेळी ई-केवायसी करत असल्याने सर्व्हरवर मोठा ताण येतो. यामुळे –

ऑपरेटर्सचा वेळ वाया जातो.

महिलांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते.

एरर दाखवल्यामुळे प्रक्रिया अपूर्ण राहते.

काही जण तर म्हणतात की “दिवसभर प्रयत्न करूनही दोन-चार महिलांचेच केवायसी होतात.”

मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया

ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत महिलांच्या तक्रारी लक्षात घेऊन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमधून स्पष्ट केले की –
“लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत सध्या तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या तातडीने सोडवण्यासाठी काम सुरू आहे. महिलांना लाभ मिळण्यात अडथळा येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे.”

यामुळे महिलांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *